पाटी पेन्सिल दे ग मला
शाळेमध्ये जाईन, धडा पहिला गिरवीन,
आई मला छोटीसी बंदुक देना!
बंदुक घेईन! शिपाई होईन!
ऐटीत चालीन! एक दोन तीन!
लहान मुले आपले बोबडे बोल बोलत असत त्याचं आईला खुप कौतुक वाटतं. त्या मुलाने गुणगुणलेलं गाणं त्याचं कौतुक करते. मुलं जणूकाही त्यांचं भविष्य सांगत असेच वाटत राहते, तेच बरोबर आहे. याची सुरुवात घरातूनच होते. पाटी पेन्सिल घेऊन मुलं स्वप्नातील शाळेत रमून इच्छा व्यक्त करते.
अशीत तुमच्या आमच्या स्वप्नातील शाळा उभारण्याचे काम मा. श्री. आनंदराव (दादा) माईंगडे यांनी केले. शाहुवाडी तालुक्यातील तुरुकवाडी गावात शैक्षणिक क्रांतिची ज्योत त्यांनी पेटवली. तुरुकवाडीच्या माळरानावर विद्येची देवता सरस्वती विराजमान झाली. दिनांक १८ जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती मा. श्री. शिवाजीराव देशमुख यांच्या शुभहस्ते श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ‘दत्तसेवा विद्यालया’चा पायापुजन कार्यक्रम झाला. तसेच संस्थेच्या नुतन इमारत उद्घाटन सोहळा मा. आमदार श्री. विनय कोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून निर्माण होतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी माळरानावर असलेल्या वृक्षवल्लींच्या छायेखाली एक नव्हे तर बघता बघता दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत. कारण लहान वयात मुलांच्या बालमनावर शाळेची प्रतिबिंब उमटविण्याचा प्रयत्न मा. दादांच्या ठायी दिसून येतो. शाळेच्या चारही बाजूंना निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. शाळेत प्रवेश करतानाच मन आनंदाने भरुन जाते. प्रवेश द्वाराजवळ मन शांत करणारी हिरवळ असून सभोवती विविध प्रकारची झाडे आहेत. इमारतीचे एकूण क्षेत्रफळ १२००० चौरस फुट असून श्री पोतदारसर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचे बांधकाम पुर्ण केलेले आहे. विद्यालयाचे वर्ग, शाळेचे कार्यालय रखवालदाराकडून आपले स्वागत केले जाते. गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाची मुर्ती व आमच्या परिवाराचे आराध्य दैवत श्री. दत्त यांची येणाऱ्या प्रत्येकाला आशिर्वाद देण्यासाठी उभी आहेत हे पाहून नेत्र सुखावतात.
प्राथमिक वर्ग
आत इमारतीच्या दोन्ही बाजूस दोन जिने आहेत. मध्येच षटकोनाकृती १६०० चौ.फु. मोकळी जागा असून यामध्ये १००० विद्यार्थी बसू शकतात. तळमजल्यालक ग्रीन मार्बल बसवले आहेत. तेथे सहा वर्ग आणि दोन कार्यालये आहेत यामध्ये छोटा शिशु, मोठा शिशु ई. पहिलीचे वर्ग आहेत. पहिल्या मजल्यावर नऊ वर्ग आहेत. यामध्ये प्रशस्त संगणक कक्ष, स्टोअर रुम प्रयोगशाळा, ग्रंथालय अशी सुव्यवस्थित रचना केलेली आहे. पहिल्या मजल्यावर इयत्ता दुसरी ते सातवीचे वर्ग आहेत. दुसऱ्या मजल्यावर प्रशस्त प्रयोगशाळा आहे.
माध्यमिक विभाग
शाळेची दुसरी इमारत म्हणजे माध्यमिक विभाग, या विभागात आठवी ते १२ चे वर्ग असून यामध्ये सुसज्ज ग्रंथालय, जिमखान तसेच परीक्षा असे विभाग आहेत.
मा. दादांच्या स्वप्नपूर्तीतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन होते. त्यापैकी एक म्हणजे दत्त जयंतीचा कार्यक्रम तसेच वार्षिक स्नेहसंमेलन घेतले जाते. यासाठी २०१० मध्ये दोन्ही इमारतींच्या मध्ये हॉलचे बांधकाम केले आहे. प्रशस्त हॉलमध्ये दोन खोल्या तयार आहेत. बहुसंख्य लोक आरामात बसु शकतात असा मोठा हॉल आहे.
या इमारतीत प्रत्येक वर्गात मुलांना बसण्यासाठी बॅचेसची सोय आहे. प्रशस्त ग्रंथालय, संगणक कक्ष, शाळेच्या साहित्याची जपणूक करणारे स्टोअर रुम, ग्लासेसचे बॅचकार्ड, स्वच्छता व आकर्षकतेने व साहित्य ठेवण्याची सोय आहे. ही शाळा प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात गावापासून दुर असल्याने मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहते.
ही अशी आमची शाळा,
जशी लाविते लळा, माऊली बाळा!
अशाप्रकारे सर्व भौतिक सोयी-सुविधांनी गरुडझेप घेण्यासाठी मा. दादांनी स्वतःच्या कल्पनेतून तुमच्या आमच्या सर्वांच्या यशाची स्वप्नपूर्ती केली आहे.