।। कुणी न राहो दुर्बल अज्ञ, म्हणूनी हा शिक्षण यज्ञ ।।
हे ब्रिदवाक्य पुर्ण करण्याचा विडाच आमच्या दत्तसेवा विद्यालयाने उचलला आहे आणि या कामात प्रत्येक आपली भूमिका बजावत आहे. आमच्या विद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांचा विकास हा एकच ध्यास आम्ही घेतलेला असून त्यासाठी आमचा शिक्षक वर्ग नेहमीच कार्यरत असतो. आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक अनुभवी, प्रशिक्षित आणि नित्य नव्या संकल्पाचे धनी आहेत.
अधिक वाचादत्तसेवा विद्यालयाच्या इमारतीची एकूण क्षेत्रफळ १२००० चौ.फु. आहे. श्री. संजय पोतदारसर यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. विद्यालयाचे वर्ग, शाळेचे कार्यालय, मुख्याध्यापक कक्ष व प्रशासकीय विभाग यांचा समावेश इमारतीत असून प्रवेशद्वारातच रखवालदाराकडून स्वागत केले जाते.
अधिक वाचाविद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास होण्यासाठी दत्तसेवा विद्यालयात विविध शैक्षणिक कक्ष सुरु केलेले आहेत. आम्हाला विद्यार्थ्याचे भविष्य घडवायचे असल्याने त्यांना पुरविले जाणारे शिक्षणही अतिशय सोप्या आणि प्रयोगाद्वारे शिकवून त्यांच्या मुलभूत गुणांचा विकास करणे गरजेचे त्यासाठी अत्याधुनिक कक्षांची निर्मिती केली गेलेली आहे.
अधिक वाचादत्तसेवा विद्यालयात शिकण्यासाठी कोल्हापूर परिसरातील वेगवेगळ्या विभागातून विद्यार्थ्यांसाठी शाळेचे स्वतःचे हॉस्टेल उभारण्यात आलेले असून त्याचबरोबर रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विद्यार्थी बससेवा सुरु केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी क्रिडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम शाळेत घेतले जातात.
अधिक वाचा