प्रवेश प्रक्रिया – कोणत्याही वर्गासाठी प्रवेश मिळवण्यास शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर प्रवेश पुर्व चाचणी परीक्षा, लेखी परीक्षा तसेच शारीरिक सक्षम विद्यार्थी व त्यांचे पालक यांची मुलाखत या सर्व पात्रता फेऱ्या देणे अनिवार्य आहे. संपूर्ण प्रवेश अर्ज व्यवस्थित, बिनचुक भरून दिलेल्या मुदतीत आवश्यक त्या दाखल्यांसह सादर केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश पात्रता परीक्षा देता येते.

लेखी परीक्षा –

विद्यार्थ्यांची मुलाखत मंडळामार्फत घेण्यात येते. मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची चाणाक्ष बुध्दी, आत्मविश्वास, धीटपणा, तोतरेपणा यांची चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांचीही मुलाखत घेतली जाते. वरील सर्व फेऱ्या पुर्ण झाल्यानंतर अनूसुचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्गीय व पुढारलेल्या प्रवर्गातील शासकीय टक्केवारीप्रमाणे गुणक्रमाने निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतिक्षा यादी शाळेच्या सुचना फलकावर लावण्यात येते. विद्यार्थ्यांच्या निवडीबाबत कुठलाही पत्रव्यवहार केला जात नाही. आरक्षित जागी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाचे साक्षांकित केलेले जातीचे प्रमाणपत्र व पालकांनी योग्य अधिकाऱ्याचा उत्पन्न दाखला सादर न केल्यास आरक्षित जागेस पात्र रहात नाही.

पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत जोडायची कागदपत्रे –

  1. मागील इयत्तेची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला
  2. पासपोर्ट आकाराचा फोट
  3. जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी)
  4. उत्पन्नाचा दाखल
  5. माजी सैनिकांच्या मुलांकरिता माजी सैनिक असल्याचे योग्य प्रमाणपत्र

प्रवेश परीक्षांचे माध्यम मराठी आहे.

शैक्षणिक सत्र

प्रथम सत्र – जुन ते ऑक्टोबर
द्वितिय सत्र – नोव्हेंबर ते मे
दोन्ही सत्रांमध्ये शाळा सुरु होण्याचा दिवस पालकांना कळविला जातो.

शालेय अभ्यासक्रम –

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांनी निर्धारित केलेला अभ्यासक्रम इयत्ता आठवी ते दहावी करिता असते. शाळेचे माध्यम मराठी आहे, परंतु गणित व शास्त्र हे विषय ज्यादा तासिकेसाठी निवडले जातात. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कवायत, कराटे, संगणक, सामान्य ज्ञान, इंग्रजी संभाषण, गिर्यारोहण, ट्रॅकींग, गटचर्चा इ. शिकवले जाते.

सहशालेय अभ्यासक्रम –

  1. वकृत्व, चित्रकला, कथाकथन, स्मरणशक्ती, हस्ताक्षर, गायन इ. स्पर्धांचे आयोजन केले जाते.
  2. राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सणानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.
  3. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते.
  4. प्रत्येक विद्यार्थाचा वाढदिवस वैयक्तिक तसेच सामुहिक स्तरावर पुर्वपरवानगीने साजरे केले जातात.
  5. स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली, क्रीडा महोत्सव आयोजित केले जातात.
  6. पाठांतर, संस्कार वर्ग वैगेरेंचे आयोजन केले जाते.

भोजन व्यवस्था (निवासी विद्यार्थ्यांसाठी)

दत्तसेवा विद्यालय ही निवासी शाळा असल्याने विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था शाळेमार्फत करण्यात येते. शाळेने तयार केलेल्या मेनूकार्डाप्रमाणे विद्यार्थ्यांना आहार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या संतुलित आहाराबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. ठरलेल्या वेळी योग्य तो आहार देण्यात येतो. आहारात दुध, अंडी, मटण, फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, बिस्कीटं यांचा समावेश असतो.